Sunday, 16 November 2014

काय बोलू प्रेमाबद्दल…

काय बोलू प्रेमाबद्दल…
जे मनात आहे ते ओठावर नसत…
काय बोलू प्रेमाबद्दल …
कधी हृद्यात आहे ते डोळ्यात दिसत …
काय बोलू प्रेमाबद्दल …
कधी व्यक्त होत कधी अचानात समोर येत …
काय बोलू प्रेमाबद्दल …
कधी हवहवास वाटत कधी दुरूनच छान दिसत…
काय बोलू प्रेमाबद्दल …
कधी आठवणीत असत कधी ते घडताना दिसत …
काय बोलू प्रेमाबद्दल …
कधी कुठेच नसत कधी सगळीकडे असत …
काय बोलू प्रेमाबद्दल …
कधी तुझ्या मनात असत कधी माझ्या मनात असत … 

संसार

एक श्वास एक विश्वास..
ह्या जगण्याला तुजीच् साथ..
एक जीवन एक वचन..
झाले दोघांचे एक मन..
एक विचार एक निर्धार..
आयुष्याच्या घड़नीला दोघांचा आधार..
एक घर एक सार .. 
दोन मनांचा एक झाला संसार..