Wednesday, 6 June 2018

साद

एक होती हाक माझी त्यास साद कुठली दिसू दे..
काही नसले तरी ईश्वरा आशिर्वाद हा पाठी असू दे..

दृढ कल्पनेच्या ह्या पाखराला पंख आता फुटू दे..
घेऊ भरारी ह्या आसमंती, जरी नभ हे उंची असू दे..

घेतला हा ध्यास हाती मज बळ हे अंगी भिणू दे..
थकले कधी जर कर, मैत्रीचा साथ खंबीर असू दे..

दुःखात सुद्धा हास्य माझ्या या मुखावरी दिसू दे..
जगण्यात माझ्याही कुणाची ही प्रेरणा तू मिळू दे..

मागणे एक हेच कुणाचे मन ना मज कडूनी दुखू दे..
दुखावले मन सुज्ञ करण्या शक्ती संगी माझ्या असू दे..

लक्ष करण्या साध्य हिम्मत अन् गुण हे कामी पडू दे..
संकटे झेलण्या अन् लढण्याची जिद्द ही वृत्ती असू दे..

...सुमित

2 comments: