एक सहवास हवा तुझा अगदी शेवटच्या श्वासपर्यंतचा..
एक सहवास हवा माझ्यापासून तुझ्यापर्यंत पोहचण्याचा..
कधी सोबत जगण्याचा आणि कधी दुरावे सहन करण्याचा..
कधी तुझ्यात मला शोधण्याचा अन् कधी माझ्यात तुला सामवण्याचा..
एक सहवास स्वतःला विसरून तुझा माझ्यासाठी जगण्याचा अन् कधी माझा तुझ्यासाठी जगण्याचा..
कधी जवळ असूनही थोड एकमेकांपासून दूर राहण्याचा..
अन् एकमेकांना ना समजता ही समजून घेण्याचा..
एक सहवास असावा तुझ्या माझ्यातल्या मी पासून आम्ही पर्यंत पोहचण्याचा..
कुठे मागे पडलो तर मागे वळून पाहणारा आणि हात देऊन पुढे घेऊन जाणारा..
कधी चुकलो तर सांभाळून घेणारा तर कधी त्याच चुका दाखवणारा..
एक सहवास असावा कायम साथ देण्याची आशा देणारा आणि नसेल तरी ती आस देणारा..

...सुमित जेजुरीकर