Saturday, 19 July 2025

भेट

अचानक एक दिवस रस्त्याने ती समोर आली,

तिची आणि माझी फक्त नजरा नजर झाली.


सगळ्या त्या आठवणी अशा डोळ्यासमोरून धाऊन आल्या,

कट्ट्यावरच्या गप्पानं पासून ते टेकडीवरच्या सूर्यास्तापर्यंत कानात गोष्टी सांगून गेल्या.


क्षणिक होती भेट ती पण नजर अशी खिळली होती,

तुझ्या माझ्या श्वासातली जागा एकत्र जुळली होती.


जरी कितीही जुनी भेट आपली, पण तुझा हात आता परका आहे.

पण शेवटच्या भेटीत भिजलेला माझा खांदा अजूनही ओला आहे.


अर्धवट सोडला तू, माझा तुझा अतूट साथ,

मी अजूनही तिथेच उभा मात्र तू बदलली वाट.


मी पण सावरलो आहे आता, तुझाच फक्त नाही राहिलो.

पण शब्दांमध्ये माझ्या कधी कधी तुलाच शोधत राहिलो.


वाटतं, कधी तू बदलली नसतीस तरी मी अजूनही तुझाच असतो का?

प्रेम, हृदय, भावनांच्या ह्या गोष्टी सांगत फिरत असतो का?


आजही किती माझ्या आयुष्यातमधे तुझी छाप आहे.

माझ्या प्रेमभंगाच्या कथे मध्ये कायम तुझ नाव आहे.


खूप जुनी आठवण आपली, बरीच वर्ष एकत्र पाहिली.

तुझ्या माझ्या प्रेमाला कधी हद्द नव्हती राहिली.


पण जशी तू कोणाची झालीस,मी आब तुझी राखली.

जवळून जरी गेली तरी, कधी ओळख नाही दाखवली.


पण आठवणीत आहेत ते जुने दिवस त्या संध्या आणि त्या रात्री.

रंगीत पाण्याबरोबर त्याला करून देतो कधी वाट तर कधी लावतो कात्री.


जेव्हा सुटशील तू सगळ्या बंधनामधून तेव्हांच भेटायला ये,

शब्द असतील माझे, तू फक्त तुझा वेळ घेऊन ये. 

शब्द असतील माझे, तू फक्त तुझा वेळ घेऊन ये....


कवी: सुमित जेजुरीकर....