Thursday, 13 December 2018

एकतर्फी...

खूप काही सांगायला होत..
पण ते कधी ओठांवर आल नाही..
खूप काही लिहायचं होत..
पण ते कधी कागदावर आल नाही..

दुरून का होईना मी जपत होतो त्या अबोल नात्याला..
हातात हात घेता नाही आला तरी कधी  खंत नव्हती मनाला..

मित्र असलो जरी तरी तुला कधी सांगायची हिम्मत झाली नाही..
कारण जपत होतो त्या नात्याला दुसरं नाव द्यायची गरज वाटलीच नाही..

एकदा झाली जाणीव आणि वाटलं की सांगून टाकावं..
मनातल्या भावनांना वाट करून थोड त्यात व्ह्यावत जावं..

भीती होती मनात की वाटेल तुला काय हे सगळं..
प्रेमाच्या बोलांमधे मैत्री हरवून घडणार नाही ना वेगळं..

कारण तू माझी नसतानाही प्रत्येक क्षणी माझीच होतीस..
मनाच्या घरात तू अगदी हृद्याजवळ बसली होतीस..

तुला हसताना पाहताना मला अगदी खूप हसू यायचं..
तुझ्या डोळ्यातल्या आसवांना मात्र घालवस वाटायचं..

आपल्या निखळ मैत्री मध्ये मला खूप आनंद मिळायचा..
म्हणून मला कधी ह्याला दुसरा रंगच नव्हता द्यायचा..

कधी आणि कुठे मी चुकल मला हे समजलं नाही..
कारण नसताना दुरावलो आणि काहीच उरलं नाही..

कधी मला वाटलं की तिला सुद्धा काही होत बोलायचं..
पण मीच आपला एकतर्फी म्हणून दुर्लक्ष मात्र करायचं..

जर ती माझी झाली असती तर आज वेळ काही वेगळी असती..
प्रश्न पडतो काय माझी मैत्रीची कथा आज जितकी सुंदर असती..

...सुमित जेजुरीकर

Saturday, 6 October 2018

कास

तो हलका दरवळणारा त्या रानफुलांचा सुवास..
हिरव्या पानांमधुनी डोकवणारा त्यांचा तो प्रयास..
प्रत्येकाच्या मनाला लावून जाणारा एक असा ध्यास..
की निसर्गाच्या सान्निध्यात घ्यावा असा मोकळा श्वास..

दवांचे ते थवे त्या नव्या पालवी वर असे विसावले..
त्या रंगीत फुलांच्या अवती भवती भ्रमर गुणगुणले..
मधेच काळया लाल मातीने त्याला थोडेसे डागाळले..
नको दृष्ट लागण्या त्या सौंदर्याला म्हणून सावरले..

आसमंत सुद्धा ह्याला उत्सफूर्तपणे साथ देतो..
निळसर पांढरी चादर त्याची अलगद त्यावर नेतो..
हे दृश्य चित्रकाराला जणू तो उभे आव्हान करतो..
रंग ना छटा पुरे पडतील जसे उमगुन क्षन जातो...

वाटे असेकी स्वर्गच जणू अवतरला ह्या धरतीवर..
सप्त रंगाहूणी अधिक मोठी ही त्याची नजरेला सर..
डोळे भरून पहावा अशा उत्सवाचा हा एक प्रहर..
सृष्टीच्या ह्या अद्भुत किमयेला ना लागो कसली नजर..

ऋ‌‌ॄतु असा हा जरी असेल अवखळ कितीही..
क्षणभंगुर आहे ही त्याची अवधी तरीही..
कीर्ती उत्सवाची नाही कमी अगदी कुठेही..
जपावी त्याची ही आठवण आपल्या हृदयी..

...सुमित

Monday, 24 September 2018

मिलन

बेधुंद या मनाची साद कधी देणार तू....
वेड्या या मनाच्या मिठीत कधी फुलणार तू....

रणरणत्या उन्हामध्ये झुळूक कधी येशील तू....
तहानलेल्या पामराला तृप्त कधी करणार तू....

भाबडे जरी असे हे हृदय माझे शोधी तुला....
क्षितिज पार केले तुजसाठी तरी ना दिला दिलासा मला....

सृष्टीचा हा इशारा सांग कधी समजणार तुला....
प्राण तळमळतो तुजसाठी दिसत का नाही तुला....

कंठ येतो दाटून अन् शब्द पडती अपुरे....
धीर सोडे हृदय माझे समय ना येथे उरे....

झाकलेल्या पापण्यांनी स्वप्न तुझेच रेखितो....
आसमतांच्या रेखांमध्ये चित्र तुझेच पाहतो...

...सुमित

Wednesday, 12 September 2018

मन चंचल मन बावरे हे..

मन चंचल मन बावरे हे.. वाटेवरी हरवले पुन्हा..

दिसेल त्या अन् सुचेल त्या चालले हे कोण्या मार्गी..
नाही त्याला ध्यास कुणाचा, ना कुठल्या आठवणी..
ना कुणाची साथ त्याला अन् ना विरह यातना..
मन चंचल मन बावरे हे.. वाटेवरी हरवले पुन्हा..


काहूर त्याचा थांबला, अन् शांत त्याची स्पंदने..
विसर पडला ह्या जगाचा, अन् थांबली ती चिंतने..
सोडूनी सर त्या मोहाची, विभक्त झाली लोचने..
मन चंचल मन बावरे हे.. वाटेवरी हरवले पुन्हा..

त्याचेच काही ना राहिले, अन् ना स्वतःची सांत्वना..
सोडून सारी आकर्षणे ती, अन् सोडूनी त्या भावना..
व्यक्त होण्याची ना सुखे, अन् सुप्त त्याच्या कामना..
मन चंचल मन बावरे हे.. वाटेवरी हरवले पुन्हा..

.. सुमित जेजुरीकर

Thursday, 6 September 2018

नाण्याची एक बाजू

     आपण समाजाचं काही तरी देणं लागतो हा विचार करून समाजसेवेकडे वळणारे बरीच लोकं आहेत. हो काही समाजसेवेचे भांडवल करून स्वतचं घर भरणारे देखील आहेत. तर काही आपल्याला बर वाटत म्हणून काही तरी करू असे देखील आहेत आणि काही Latest Genaration मधले Social Media Warrior पन आहेत. पण ह्या सगळ्यात ज्यांना खरोखरच त्या गोष्टीची गरज आहे त्यांच्यापर्यंत किती मदत पोहचते हा एक वादाचा मुद्दा आहे. असो पण समाजसेवा करणं थांबवणे हा त्यावरचा उपाय नाही. कारण कोणत्याही कारणाने का होईना कोण्या गरजू व्यक्तीला मदत मिळणे अपेक्षित एवढंच.

     सदर गोष्टीवरून एकदा एकाने मला त्याच्या लहान मुलाचा वाढदिवस तो अनाथ आश्रमात(Orphanage) साजरा करणार असल्याचं सांगितलं. एका दृष्टीने एक चांगला पाऊल पण त्यात एक गोष्ट आपण सतत विसरतो मोठ्या माणसांचे वाढदिवस साजरे करणे आणि लहान मुलांचे वाढदिवस असे साजरे करण्यात एक फरक आहे. तुम्ही वाटेल Age चा ? नक्कीच नाही. फरक आहे समजुतीचा. अगदी शाळेतलं exmaple घ्या तुमच्याच शाळेतलं. कधी तुम्ही लहान असताना नवीन compass box दाखवून मित्राला किवा मैत्रिणीला चिडवलही असेल किंवा तुम्ही तुमच्या मित्राकडे असे काही पाहून हे माझ्या कडे का नाही ह्याचा विचार केला असेल ना? तसच काहीस आहे ह्या वाढदिवसाच्या विचारात. तुम्ही आई बाप म्हणून स्वतः च्या मुलाला "Sharing is Caring" शिकवायच्या नादा मध्ये हे दुर्लक्ष करता की त्या मुलांना आपण काय दाखवतोय. आज नवीन कपड्यात त्या मुलांमध्ये उभा राहिलेला मुलगा डोळ्यासमोर आणा. Difference तुम्हाला जाणवेल. त्या मुलांसाठी काही करण्यासाठी धजावलेले तुमचे हातचं कधी तुमच्या मुलाचे लाड करण्यासाठी तिकडे वळतील हे तुम्हाला कळणार नाही आणि अजणाते पणें का होईना. त्या मुलांना ह्या गोष्टींची जाणीव तुम्ही करून द्याल की त्यांच्याकडे काय कमी आहे. तुम्ही स्वतःचा आनंद साजरा करताना त्यांच्या मनावर काय Impact सोडणार आहात हा विचार करा. मी अस म्हणत नाही की अस घडेलच पण आपला आनंद साजरा करायची एक वेळ नक्की येईल कदाचित त्या वेळेची वाट तुम्हाला पहावी लागेल. जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाकडे लक्ष देण्याची गरज नसेल त्या वेळी तुम्ही ही risk घेऊ शकता. जेव्हा खरोखरच तुमच्या मुलाला समजू शकेल की आपल्याला काय extra मिळालंय आणि त्यांच्याकडे काय previlage नाहीये. आता तुम्ही निवडा की तुम्हाला तुमच्या मुलाचा वाढदिवस कधी, केव्हा, कुठे आणि कसा साजरा करायचा.

    हा एक दृष्टीकोन आहे फक्त एक दृष्टीकोन. जश्या नाण्याच्या दोन बाजू असतात तश्या ह्या बाजूचा विचार करून बघा. बाकी निर्णय काय घ्यायचा हे तुमच्या हातात आहे.

...सुमित जेजुरीकर

Monday, 3 September 2018

तुझी मी

मी तुझ्या मनातून त्या कागदात उतरणारी..

तू रंगवलेल्या जगात उसंतपणे उडणारी..

कधी हरवलेली कधी ना सुचलेल्या ओळीत विसनारी..

तू विचारांच्या गर्दीत असताना तुला अचानक हाक देऊन जाणारी..

मी तुला दुःखातली साथीदार तर कधी तुझ्या सुखात वाटेकरी असणारी..

तुझ्या मुक्त भावनांना वाट करून देणारी..

कधी मंद लाटांमध्ये स्वार होऊन किनाऱ्यावर लोप होणारी..

कधी उस्फुर्त पणे पर्वता प्रमाणे वाटणारी..

तर कधी झुळ झुळं त्या पाण्या प्रमाणे वाहणारी..

आणि कधी शेवट सुचत नाही म्हणून सतत त्रास देणारी..

मी तुझीच रचना अन् तुझ्या कायम ह्रदयाजवळ असणारी.. तुझी कविता..

... सुमित जेजुरीकर..

Monday, 23 July 2018

संधी

हा तसा माझा पहिलाच गद्य ब्लॉग. कारण सतत कविता करणारा मी असा काही लिहण्यासाठी विषय शोधण्याचा प्रयत्न करत असायचो पण तसा खूप काही घडलं नाही. पण   काल मात्र असा काही घडलं की मला आलेला अनुभव शेअर केल्याविना राहवलं नाही.
     माझ्या सामाजिक कामाकरीता मी एका गावात गेलो होतो. गाव तस पुण्यापासून ९० किलोमीटर वर. पण तिथे अजूनही अगदी खेडेगावात असते तशी परिस्थिती. गावात विजेची सोय जेमतेम घरे ही मातीची आणि कौलारू एखादाच घर विटा बंडकमाच असेल. जिल्हा परिषदेच्या शाळेत एकूण १९ च मुलांची पटसंख्या. पण शाळा होती ही महत्त्वाची बाब सर्व शिक्षण अभियानाची कृपा आणखी काय म्हणणार. आम्ही (माझे इतर सहकारी) तिथे पोहचलो सकाळी ८:२० च्या सुमारास पाहिलं तर शाळा बंद होती. वाटलं आज जास्त पाऊस असल्याने शाळा बंद असेल. कारण हा अत्यंत डोंगराळ भाग पाऊस खूपच आणि मुले अगदी ४ ते ५ किलोमीटवरील गावांतून येतात. म्हणून हे सगळं वाटणं स्वाभाविक होतं. पण आम्ही शेजारच्या घरातून आवाज देताच एक लहान मुलगा आणि मुलगी अगदी लगबीनं घरच्या बाहेर आले शाळेच्या गणवेशात होते आणि थोड्या लांब तो मुलगा पळतोच मागून एक आवाज आला "अरे चावी तर घेऊन जा". तो तसाच मागे वळला. चावी घरातून घेताच परत तेवढ्याच वेगाने त्याने शाळेकडे धाव घेतली. (शाळेचं चावी त्याच्या घरच्याकडे असण्याचे कारण हे गाव अगदी दुर्गम भागात असल्याने तिथे रहिवासी कुटुंबाकडे त्याची एक चावी आहे) त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी शब्दात वर्णन करता येणार नाही असा होता. आम्ही काही लोकं येणार याची पूर्व कल्पना असावी जरा असा वाटलं. पण शाळेत जाण्यासाठी एवढं उत्साही असणारा विद्यार्थी मी "3 idiots" नंतर आताच पहिला होता. थोडी मला पण  स्वतः ची लाज वाटली. कारण एवढा उत्साही कधी मी पण नव्हतो शाळेत जाण्यासाठी. तो मुलगा आणि त्याच्या सोबत त्याची बहीण शाळेचं कुलूप उघडून आत गेले. शाळेच्या आत जाताच पठ्याने एकदम झाडू हातात घेऊन शाळा झाडायला सुरवात केली. त्याला कारण विचारता म्हणाला "आम्ही रोजच झाडतो आज प्रियांका चा टर्न आहे ती अजून आली नाही म्हणून मी झाडतोय" अचानकच जपान मधल्या शाळांच्या व्हिडिओ ची आठवण झाली YouTube वर असाच काही तरी पाहिलं होता. आपण आपल्या कडे असा काही का करत नाही असा विचार केला होता तेव्हा पण आपल्या कडे हल्ली so called sofisticated लोकांच्या आठवणी आल्या आणि जाऊं दे म्हटलं तेव्हा. पण त्या मुलाचं काम पाहून खरोखरच अभिमान वाटला. थोड्या वेळाने म्हणजे अगदी पाच मिनिटात त्याने झाडून स्वच्छ केली शाळेची खोली आणि कचरा उचलून व्यवस्थित जमा केला व बाहेर टाकून आला. पण थोडा आपल्या systemचा दोष सापडलाच. कचरापेटी नव्हतीच. पण मला सांगा ज्या भागांत जायला रस्ता सुद्धा नाही तिथे सफाई कर्मचारी किवा त्याहून कचरापेटी कोण ठेवणार. असो पण त्यात फार काही पर्यावरणाला धोकादायक कचरा नव्हता!
    थोड्या वेळातच मुले शाळेत जमा होऊ लागली त्यांनी अगदी व्यवस्थित रेनकोट आणि चपला बाहेर ठेवल्या व आता जाऊन बसले. हे शाळेत उशिरा आलेली मुले तिथून २ ते अडीच किलमीटर लांब असलेल्या एका छोट्याश्या पाड्यातून आली होती जिथून यायला पक्का सोडा कच्चा रस्ता सुध्दा नाही. पण त्याच्या बरोबरच आलेल्या एका स्थानिक विद्यार्थ्याने सांगितले. हा १६ वर्षाचा युवक BSC करण्यासाठी तालुक्या च्या ठिकाणी वसतिगृहात राहत होता कॉलेज ला सुट्टी असल्याने तो येथील मुलांना शिकवण्याचे काम करत होता. जेव्हा अश्या व्यक्ती तुमच्या समोर येतात तेव्हा तुम्हाला स्वतःची उंची खूपच कमी वाटू लागते. पण तुम्हाला हे पण समजत की निस्वार्थीपणे काम करणारे जगात माणसे आहेत. तो म्हणाला "यांचे आई वडील शेती आणि गुरे चारण्याची कामे करतात. पण पाऊस असला तरी ही मुले कधी ही शाळा miss  करत नाहीत". आम्ही आमच्या session ची सूरवात परीचयाने केली. त्यात प्रत्येकाने आपली hobby वाचन ही सांगितली.  त्यातच दोन मुलांनी हॉकी ही hobby सांगितली. आश्चर्याची बाबच  होती एका गावात हॉकी बद्दल मुलांनी आवड म्हणून सांगणे ही कदाचित ना पचनारी गोष्ट!(आपल्या कडे क्रिकेट एवढे लोकप्रिय आहे) असो त्यांची वाचण्याची hobby test करण्या करिता मी काही शब्द लिहले जी त्यांनी अगदी सहज वाचून दाखवले. त्यावरून समजले की मुलांमध्ये खूपच जिद्द आहे आणि त्यांना खरोखरच शिक्षणाची आवड आहे. त्यांच्या बरोबर आम्ही अडीच तास घालवले आणि समजलं देखील नाही. खरोखरच अगदी कसे गेले ते समजले नाही. इच्छा असूनही आम्हाला थांबता येणार नव्हते कारण काही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दुसरीकडे जायचे असल्याने काढता पाय घ्यावा लागला. काही विद्यार्थी सोडता सगळ्यांचा response छान असल्याने आम्हालाही आनंद झाला आणि पुढच्या वेळी आम्हाला अजून कोणाकडे लक्ष द्यायचे ह्याबद्दल ही समजलं. एक बाब मात्र लक्षात आली की अजून आपल्या देशात शिक्षणाकडे हवं तेवढं लक्ष देली जात नाही. काही जागा अजूनही इतर sentiments ना आहेत. कारण शाळेची (इमारत) खोली ही पत्राची आणि मंदिर मात्र सिमेंट काँक्रिट च्या स्लॅब च होता. असो मलाही स्वतचं religious beliefs आहेत. इतरांच्या ही असतात मला जे बोलायचं कदाचित समजलं असेल.
पण त्या मुलाकडे खरोखरच कला आणि बुध्दी आहे पण फरक आहे संधीचा. मी त्याच देवळातल्या ईश्वर चरणी प्रार्थना करतो ज्यापद्धतीने ते त्याची सेवा करतात. त्याच प्रमाणे त्या मुलांना त्यांचं इच्छित फळ मिळो.

धन्यवाद,
सुमित जेजुरीकर

Tuesday, 26 June 2018

अहसास..

हिंदी अनुवाद :- तुझ्याशिवाय आयुष्यात काही नाही... (मराठी कविता)
अहसास..

इन आंखोंमैं मेरे आंसुओको भी जगह नहीं।
यहां तेरा चेहरा बसता है उन बूंदों को भी जगह नहीं।

मेरे मन में किसिके जशन की जगह भी नहीं।
यहां तेरी यादें बसती है मेरी खुशियों को भी एहमत नहीं।


इन हाथों को किसी और का इंतज़ार नहीं।
यहां तेरा लम्स समाया है अभी जैसा किसी का भी और नहीं।

इन कानोमे भी मेरे किसिकी आवाज नहीं।
यहां तेरी हंसी गूंजती है किसी और की भी राहत नहीं।

इस दिल में मेरे जज़्बातों को भी जगह नहीं।
क्योंकि वहां पे तुम रहती हो मेरी सांसों को भी जगह नहीं।

...सुमित

Thursday, 14 June 2018

तेरा इंतज़ार

क्यों मेरा मन आज कहीं खो सा गया है।
इस घनी सी धुंद में कहीं रुक सा गया है।

यह ओस की बूंदें दिलको रही भिगाती।
उसकी ठंडक मेरे मन को ऐसी लुभाती।

पता नहीं दिल में इतनी हलचल क्यों है।
जैसे शितल सागर में लेहेरे उमड़ती यूं है।

इन भीगी आंखोसे आंखे कभी मिलती नहीं।
तेरे फूलोंसे होटोंकी याद अभी तक जाती नहीं।

अब यह राहें हमसे तो बेगानी हो रही है।
तेरी यादें मेरी यादोंमेसे फनाह हो रही है।

इन धूंदलोसे रास्तों पे क्यों चलता मैं बेकरार।
अभी भी क्यों इस दिल को है तेरा इंतज़ार।

.. सुमित

Friday, 8 June 2018

शाळेच्या आठवणी

कधी तरी अस वाटत परत भूतकाळात जावं..
पुन्हा शाळेच्या त्या लाकडी बाकावर बसावं..

काळया फळ्यावरच्या त्या शब्दांप्रमाने असावं..
पांढऱ्या खडूच्या रेघांमध्ये सार जग दिसावं..

आठवते मला शाळेची ती प्रार्थनेची वेळ..
रांगेत उभे राहून करायचा शिस्तीशी मेळ..

आठवते आजही मला ती मधली सुट्टीची घंटा..
जेवणाचे डबे उघडताच सगळे सोडायचे तंटा..

कडक् शिक्षक येताच भीती वाटायची जाम..
गृहपाठ केला नसेल तर मात्र फुटायचा घाम..

शाळेतल्या तासांची तर किमायच होती न्यारी..
माहिती होती यारी नव्हती कसली दुनियादारी..

शाळेतल्या त्या खेळांमध्ये असे काही रंगायचो..
कधी कधी भांडायचे तर कधी संगे नचायचो..

परीक्षेच्या वेळी अगदी सगळे अभ्यासाला लागायचे..
निकाल लागला की कधी हसायचे कधी रडायचे..

कवितांची गाणी व्हायची आणि धड्यांचे पाठ..
कधी वाचनाचा छंद कधी चित्रकलेचा थाठ..

विसरलो असलो धडे तरी विसरत नाही छडी..
उभ करून उत्तर सांग म्हटलं की दिसायची घडी..

म्हणतात सगळे गेलेली वेळ परत येत नाही..
शाळेतले दिवस जुने झाले तरी विसरत नाही..

आता जीवनात जरी पुढे गेलो तरी ओळख तीच जुनी..
गेले ते दिवस आणि आता राहिल्या फक्त आठवणी..

..सुमित

Wednesday, 6 June 2018

साद

एक होती हाक माझी त्यास साद कुठली दिसू दे..
काही नसले तरी ईश्वरा आशिर्वाद हा पाठी असू दे..

दृढ कल्पनेच्या ह्या पाखराला पंख आता फुटू दे..
घेऊ भरारी ह्या आसमंती, जरी नभ हे उंची असू दे..

घेतला हा ध्यास हाती मज बळ हे अंगी भिणू दे..
थकले कधी जर कर, मैत्रीचा साथ खंबीर असू दे..

दुःखात सुद्धा हास्य माझ्या या मुखावरी दिसू दे..
जगण्यात माझ्याही कुणाची ही प्रेरणा तू मिळू दे..

मागणे एक हेच कुणाचे मन ना मज कडूनी दुखू दे..
दुखावले मन सुज्ञ करण्या शक्ती संगी माझ्या असू दे..

लक्ष करण्या साध्य हिम्मत अन् गुण हे कामी पडू दे..
संकटे झेलण्या अन् लढण्याची जिद्द ही वृत्ती असू दे..

...सुमित

Tuesday, 5 June 2018

माझी माती.

जननी तू सुखाची, अन्नपूर्णा या देहाची.
कधी सखी तू , कधी वाहिनी अन् कधी साैंदर्या या रुपाची.
जन्मभूमि तू सर्वांची, कर्मभूमी तू आमची.
कधी वृध्दी, तू कधी हारिणी अन् कधी मानिनी या तेजाची.
वंदितो तुजला ह्या करांने इच्छा ह्या हृदयाची.
हरितक्रांतीचा वसा घेऊनी आता करुया पूजा ह्या मातीची..

...सुमित

Wednesday, 23 May 2018

मैं तेरा नाम भूल गया

आज कुछ पुरानी यादों से रिश्ता सा टूट गया।
जब किसीने तेरी याद दिलाई और मैं तेरा नाम भूल गया।
मेरी दिल की किताब का पन्ना सा फट गया।
जब तेरी बातों को याद करने की कोशिश करना पड गया।
कुछ राहों का पता जब नक्शों से मेरे मिट सा गया।
जब उन रास्तों की गलियों से में गुजरना सा भूल गया।
आसमानों से कुछ तारों का झुंड सा हट गया।
जब उनमें नजर सा आनेवाला तेरा चेहरा में भूल गया।

...सुमित

Monday, 2 April 2018

क्योंकि कोई भी अदा तुम्हारी यूहीं नहीं होती।

कोई भी अदा तुम्हारी यूहीं नहीं होती।

जब बालों को सहलाती हो जो हलके से,
 तो हवा को अपनी जगह है बताती ।
क्योंकि कोई भी अदा तुम्हारी यूहीं नहीं होती।

रुख मोड़ देती है वह अपनी ,
क्योंकि नाराज तो शायद तुम्हें नहीं करना चाहती।
क्योंकि कोई भी अदा तुम्हारी यूहीं नहीं होती।

आंखे जो तुम्हारी कोनेमे जो है ठहरती,
 नजर के तीर बनाके है छोड़ती।
क्योंकि कोई भी अदा तुम्हारी यूहीं नहीं होती।

आंचल यह तुम्हारा यूहीं नहीं ठहरता ,
नदी को मोड़ना सिखादे बस यही वो दिखाता।
क्योंकि नजारा वह तुम्हारा यूहीं नहीं होता।

कमर ये तुम्हारी यूहीं नहीं बलखाती,
 समंदर में लहेरे और तूफान वो उठाती।
क्योंकि कोई भी अदा तुम्हारी यूहीं नहीं होती।

कदम यह तुम्हारे यूहीं नहीं मुड़ते,
 अनजाने रस्तोंको वोह मंजिलें है बताते।
क्योंकि आशिक़ तुम्हारे यूहीं नहीं चले आते।

क्योंकि कोई भी अदा तुम्हारी यूहीं नहीं होती।

:::सुमित

Wednesday, 14 March 2018

जिंकायचं नाही विसरलो..

खूप दिवसांनी जेव्हा पहिला परत मी तुला..
तेव्हा खूप काही बोलावंसं वाटलं होतं मला..

रुख रूख होती मनाची की सांगावं एकदा तरी..
तू लांब असलीस तरी तूच होतीस माझी परी..

माहित नाही अजूनही का हा जीव तुझ्यासाठी अडकतो..
मान ठेव स्वतःचा ही समजूत घालून मी त्याला सावरतो..

माहित आहे ह्याला की तू माझी कधीच नाही होणार..
कितीही समजावलं तरी ही आस मात्र नाही जाणार..

आज सुद्धा भावना मनात आहेत कारण प्रेम खरं केलं होत..
पटल नसेल तरी जीव मात्र तेवढं मनापासून काही दिलं होत..

तुझ्यासाठी झुरलो म्हणजे मी काही कमजोर नाही पडलो..
एकदा हरलो म्हणून काय झालं जिंकायचं नाही विसरलो..