Monday, 23 July 2018

संधी

हा तसा माझा पहिलाच गद्य ब्लॉग. कारण सतत कविता करणारा मी असा काही लिहण्यासाठी विषय शोधण्याचा प्रयत्न करत असायचो पण तसा खूप काही घडलं नाही. पण   काल मात्र असा काही घडलं की मला आलेला अनुभव शेअर केल्याविना राहवलं नाही.
     माझ्या सामाजिक कामाकरीता मी एका गावात गेलो होतो. गाव तस पुण्यापासून ९० किलोमीटर वर. पण तिथे अजूनही अगदी खेडेगावात असते तशी परिस्थिती. गावात विजेची सोय जेमतेम घरे ही मातीची आणि कौलारू एखादाच घर विटा बंडकमाच असेल. जिल्हा परिषदेच्या शाळेत एकूण १९ च मुलांची पटसंख्या. पण शाळा होती ही महत्त्वाची बाब सर्व शिक्षण अभियानाची कृपा आणखी काय म्हणणार. आम्ही (माझे इतर सहकारी) तिथे पोहचलो सकाळी ८:२० च्या सुमारास पाहिलं तर शाळा बंद होती. वाटलं आज जास्त पाऊस असल्याने शाळा बंद असेल. कारण हा अत्यंत डोंगराळ भाग पाऊस खूपच आणि मुले अगदी ४ ते ५ किलोमीटवरील गावांतून येतात. म्हणून हे सगळं वाटणं स्वाभाविक होतं. पण आम्ही शेजारच्या घरातून आवाज देताच एक लहान मुलगा आणि मुलगी अगदी लगबीनं घरच्या बाहेर आले शाळेच्या गणवेशात होते आणि थोड्या लांब तो मुलगा पळतोच मागून एक आवाज आला "अरे चावी तर घेऊन जा". तो तसाच मागे वळला. चावी घरातून घेताच परत तेवढ्याच वेगाने त्याने शाळेकडे धाव घेतली. (शाळेचं चावी त्याच्या घरच्याकडे असण्याचे कारण हे गाव अगदी दुर्गम भागात असल्याने तिथे रहिवासी कुटुंबाकडे त्याची एक चावी आहे) त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी शब्दात वर्णन करता येणार नाही असा होता. आम्ही काही लोकं येणार याची पूर्व कल्पना असावी जरा असा वाटलं. पण शाळेत जाण्यासाठी एवढं उत्साही असणारा विद्यार्थी मी "3 idiots" नंतर आताच पहिला होता. थोडी मला पण  स्वतः ची लाज वाटली. कारण एवढा उत्साही कधी मी पण नव्हतो शाळेत जाण्यासाठी. तो मुलगा आणि त्याच्या सोबत त्याची बहीण शाळेचं कुलूप उघडून आत गेले. शाळेच्या आत जाताच पठ्याने एकदम झाडू हातात घेऊन शाळा झाडायला सुरवात केली. त्याला कारण विचारता म्हणाला "आम्ही रोजच झाडतो आज प्रियांका चा टर्न आहे ती अजून आली नाही म्हणून मी झाडतोय" अचानकच जपान मधल्या शाळांच्या व्हिडिओ ची आठवण झाली YouTube वर असाच काही तरी पाहिलं होता. आपण आपल्या कडे असा काही का करत नाही असा विचार केला होता तेव्हा पण आपल्या कडे हल्ली so called sofisticated लोकांच्या आठवणी आल्या आणि जाऊं दे म्हटलं तेव्हा. पण त्या मुलाचं काम पाहून खरोखरच अभिमान वाटला. थोड्या वेळाने म्हणजे अगदी पाच मिनिटात त्याने झाडून स्वच्छ केली शाळेची खोली आणि कचरा उचलून व्यवस्थित जमा केला व बाहेर टाकून आला. पण थोडा आपल्या systemचा दोष सापडलाच. कचरापेटी नव्हतीच. पण मला सांगा ज्या भागांत जायला रस्ता सुद्धा नाही तिथे सफाई कर्मचारी किवा त्याहून कचरापेटी कोण ठेवणार. असो पण त्यात फार काही पर्यावरणाला धोकादायक कचरा नव्हता!
    थोड्या वेळातच मुले शाळेत जमा होऊ लागली त्यांनी अगदी व्यवस्थित रेनकोट आणि चपला बाहेर ठेवल्या व आता जाऊन बसले. हे शाळेत उशिरा आलेली मुले तिथून २ ते अडीच किलमीटर लांब असलेल्या एका छोट्याश्या पाड्यातून आली होती जिथून यायला पक्का सोडा कच्चा रस्ता सुध्दा नाही. पण त्याच्या बरोबरच आलेल्या एका स्थानिक विद्यार्थ्याने सांगितले. हा १६ वर्षाचा युवक BSC करण्यासाठी तालुक्या च्या ठिकाणी वसतिगृहात राहत होता कॉलेज ला सुट्टी असल्याने तो येथील मुलांना शिकवण्याचे काम करत होता. जेव्हा अश्या व्यक्ती तुमच्या समोर येतात तेव्हा तुम्हाला स्वतःची उंची खूपच कमी वाटू लागते. पण तुम्हाला हे पण समजत की निस्वार्थीपणे काम करणारे जगात माणसे आहेत. तो म्हणाला "यांचे आई वडील शेती आणि गुरे चारण्याची कामे करतात. पण पाऊस असला तरी ही मुले कधी ही शाळा miss  करत नाहीत". आम्ही आमच्या session ची सूरवात परीचयाने केली. त्यात प्रत्येकाने आपली hobby वाचन ही सांगितली.  त्यातच दोन मुलांनी हॉकी ही hobby सांगितली. आश्चर्याची बाबच  होती एका गावात हॉकी बद्दल मुलांनी आवड म्हणून सांगणे ही कदाचित ना पचनारी गोष्ट!(आपल्या कडे क्रिकेट एवढे लोकप्रिय आहे) असो त्यांची वाचण्याची hobby test करण्या करिता मी काही शब्द लिहले जी त्यांनी अगदी सहज वाचून दाखवले. त्यावरून समजले की मुलांमध्ये खूपच जिद्द आहे आणि त्यांना खरोखरच शिक्षणाची आवड आहे. त्यांच्या बरोबर आम्ही अडीच तास घालवले आणि समजलं देखील नाही. खरोखरच अगदी कसे गेले ते समजले नाही. इच्छा असूनही आम्हाला थांबता येणार नव्हते कारण काही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दुसरीकडे जायचे असल्याने काढता पाय घ्यावा लागला. काही विद्यार्थी सोडता सगळ्यांचा response छान असल्याने आम्हालाही आनंद झाला आणि पुढच्या वेळी आम्हाला अजून कोणाकडे लक्ष द्यायचे ह्याबद्दल ही समजलं. एक बाब मात्र लक्षात आली की अजून आपल्या देशात शिक्षणाकडे हवं तेवढं लक्ष देली जात नाही. काही जागा अजूनही इतर sentiments ना आहेत. कारण शाळेची (इमारत) खोली ही पत्राची आणि मंदिर मात्र सिमेंट काँक्रिट च्या स्लॅब च होता. असो मलाही स्वतचं religious beliefs आहेत. इतरांच्या ही असतात मला जे बोलायचं कदाचित समजलं असेल.
पण त्या मुलाकडे खरोखरच कला आणि बुध्दी आहे पण फरक आहे संधीचा. मी त्याच देवळातल्या ईश्वर चरणी प्रार्थना करतो ज्यापद्धतीने ते त्याची सेवा करतात. त्याच प्रमाणे त्या मुलांना त्यांचं इच्छित फळ मिळो.

धन्यवाद,
सुमित जेजुरीकर

No comments:

Post a Comment