Monday, 6 April 2020

दुरावा

ती आजकाल सतत म्हणते, "तू कॉल केला की बोलत नाही."
मी म्हणतो,"काय करू मला आजकाल काही सुचत नाही."

ती म्हणते, "तू कवी ना मग का बरं बोलायला ना सूचावं,
सांग बरं शब्दाचा भांडार असणाऱ्यांच अस वागणं कसं काय रूचाव?"

मी शांत पणे तीचं सगळं ऐकून घेतो..
काही न बोलता एक श्वास गिळून घेतो..

ती मला माझ्या बऱ्याच गोष्टी सुनावत जाते..
माझ्या वागण्यातला चुका मला दाखवत जाते..

मीही सगळं गुपचूप ऐकून घेतो..
सगळी चूक माझी समजून मान्य करून घेतो..

कारण तिच्या बोलण्यातून मला तिचं,माझ्यावरच प्रेम दिसत होते..
आणि तिच्या रुसव्यातले शब्द माझ्या कानावर पडत होते..

मी कसा सांगू तिला इतके दिवस शब्द मागे पडले होते ..
नजरेने बोलायचो आपण दोघांशी असे काही घडले होते..

इतके जवळ आलो होतो की एकमेकांना सावरण्याची सवय झालती..
मधेच मात्र आता दोंघावर वेगळं राहायची वेळ आलती..

कसा सांगू तिला माझी शब्दांची सवय तिनेच मोडली..
डोळ्यांची सवय लावून मात्र आता साथ सोडली..

म्हणून काही बोलत नाही फक्त तुझा श्वास ऐकतो..
ना बोलता का होईना तो मला तुझे हाल सांगतो..

~सुमित जेजुरीकर.