Monday, 24 September 2018

मिलन

बेधुंद या मनाची साद कधी देणार तू....
वेड्या या मनाच्या मिठीत कधी फुलणार तू....

रणरणत्या उन्हामध्ये झुळूक कधी येशील तू....
तहानलेल्या पामराला तृप्त कधी करणार तू....

भाबडे जरी असे हे हृदय माझे शोधी तुला....
क्षितिज पार केले तुजसाठी तरी ना दिला दिलासा मला....

सृष्टीचा हा इशारा सांग कधी समजणार तुला....
प्राण तळमळतो तुजसाठी दिसत का नाही तुला....

कंठ येतो दाटून अन् शब्द पडती अपुरे....
धीर सोडे हृदय माझे समय ना येथे उरे....

झाकलेल्या पापण्यांनी स्वप्न तुझेच रेखितो....
आसमतांच्या रेखांमध्ये चित्र तुझेच पाहतो...

...सुमित

Wednesday, 12 September 2018

मन चंचल मन बावरे हे..

मन चंचल मन बावरे हे.. वाटेवरी हरवले पुन्हा..

दिसेल त्या अन् सुचेल त्या चालले हे कोण्या मार्गी..
नाही त्याला ध्यास कुणाचा, ना कुठल्या आठवणी..
ना कुणाची साथ त्याला अन् ना विरह यातना..
मन चंचल मन बावरे हे.. वाटेवरी हरवले पुन्हा..


काहूर त्याचा थांबला, अन् शांत त्याची स्पंदने..
विसर पडला ह्या जगाचा, अन् थांबली ती चिंतने..
सोडूनी सर त्या मोहाची, विभक्त झाली लोचने..
मन चंचल मन बावरे हे.. वाटेवरी हरवले पुन्हा..

त्याचेच काही ना राहिले, अन् ना स्वतःची सांत्वना..
सोडून सारी आकर्षणे ती, अन् सोडूनी त्या भावना..
व्यक्त होण्याची ना सुखे, अन् सुप्त त्याच्या कामना..
मन चंचल मन बावरे हे.. वाटेवरी हरवले पुन्हा..

.. सुमित जेजुरीकर

Thursday, 6 September 2018

नाण्याची एक बाजू

     आपण समाजाचं काही तरी देणं लागतो हा विचार करून समाजसेवेकडे वळणारे बरीच लोकं आहेत. हो काही समाजसेवेचे भांडवल करून स्वतचं घर भरणारे देखील आहेत. तर काही आपल्याला बर वाटत म्हणून काही तरी करू असे देखील आहेत आणि काही Latest Genaration मधले Social Media Warrior पन आहेत. पण ह्या सगळ्यात ज्यांना खरोखरच त्या गोष्टीची गरज आहे त्यांच्यापर्यंत किती मदत पोहचते हा एक वादाचा मुद्दा आहे. असो पण समाजसेवा करणं थांबवणे हा त्यावरचा उपाय नाही. कारण कोणत्याही कारणाने का होईना कोण्या गरजू व्यक्तीला मदत मिळणे अपेक्षित एवढंच.

     सदर गोष्टीवरून एकदा एकाने मला त्याच्या लहान मुलाचा वाढदिवस तो अनाथ आश्रमात(Orphanage) साजरा करणार असल्याचं सांगितलं. एका दृष्टीने एक चांगला पाऊल पण त्यात एक गोष्ट आपण सतत विसरतो मोठ्या माणसांचे वाढदिवस साजरे करणे आणि लहान मुलांचे वाढदिवस असे साजरे करण्यात एक फरक आहे. तुम्ही वाटेल Age चा ? नक्कीच नाही. फरक आहे समजुतीचा. अगदी शाळेतलं exmaple घ्या तुमच्याच शाळेतलं. कधी तुम्ही लहान असताना नवीन compass box दाखवून मित्राला किवा मैत्रिणीला चिडवलही असेल किंवा तुम्ही तुमच्या मित्राकडे असे काही पाहून हे माझ्या कडे का नाही ह्याचा विचार केला असेल ना? तसच काहीस आहे ह्या वाढदिवसाच्या विचारात. तुम्ही आई बाप म्हणून स्वतः च्या मुलाला "Sharing is Caring" शिकवायच्या नादा मध्ये हे दुर्लक्ष करता की त्या मुलांना आपण काय दाखवतोय. आज नवीन कपड्यात त्या मुलांमध्ये उभा राहिलेला मुलगा डोळ्यासमोर आणा. Difference तुम्हाला जाणवेल. त्या मुलांसाठी काही करण्यासाठी धजावलेले तुमचे हातचं कधी तुमच्या मुलाचे लाड करण्यासाठी तिकडे वळतील हे तुम्हाला कळणार नाही आणि अजणाते पणें का होईना. त्या मुलांना ह्या गोष्टींची जाणीव तुम्ही करून द्याल की त्यांच्याकडे काय कमी आहे. तुम्ही स्वतःचा आनंद साजरा करताना त्यांच्या मनावर काय Impact सोडणार आहात हा विचार करा. मी अस म्हणत नाही की अस घडेलच पण आपला आनंद साजरा करायची एक वेळ नक्की येईल कदाचित त्या वेळेची वाट तुम्हाला पहावी लागेल. जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाकडे लक्ष देण्याची गरज नसेल त्या वेळी तुम्ही ही risk घेऊ शकता. जेव्हा खरोखरच तुमच्या मुलाला समजू शकेल की आपल्याला काय extra मिळालंय आणि त्यांच्याकडे काय previlage नाहीये. आता तुम्ही निवडा की तुम्हाला तुमच्या मुलाचा वाढदिवस कधी, केव्हा, कुठे आणि कसा साजरा करायचा.

    हा एक दृष्टीकोन आहे फक्त एक दृष्टीकोन. जश्या नाण्याच्या दोन बाजू असतात तश्या ह्या बाजूचा विचार करून बघा. बाकी निर्णय काय घ्यायचा हे तुमच्या हातात आहे.

...सुमित जेजुरीकर

Monday, 3 September 2018

तुझी मी

मी तुझ्या मनातून त्या कागदात उतरणारी..

तू रंगवलेल्या जगात उसंतपणे उडणारी..

कधी हरवलेली कधी ना सुचलेल्या ओळीत विसनारी..

तू विचारांच्या गर्दीत असताना तुला अचानक हाक देऊन जाणारी..

मी तुला दुःखातली साथीदार तर कधी तुझ्या सुखात वाटेकरी असणारी..

तुझ्या मुक्त भावनांना वाट करून देणारी..

कधी मंद लाटांमध्ये स्वार होऊन किनाऱ्यावर लोप होणारी..

कधी उस्फुर्त पणे पर्वता प्रमाणे वाटणारी..

तर कधी झुळ झुळं त्या पाण्या प्रमाणे वाहणारी..

आणि कधी शेवट सुचत नाही म्हणून सतत त्रास देणारी..

मी तुझीच रचना अन् तुझ्या कायम ह्रदयाजवळ असणारी.. तुझी कविता..

... सुमित जेजुरीकर..