आज आभाळाला जाणीव झाली.
आज आभाळाला जाणीव झाली,
किती सारी त्याची चूक झाली.
नाही तिथे तो बरसून गेला,
जिथे गरज, तिथे थेंब ना मिळाला.
एक सुने आंगण पडले होते,
एक मात्र पाण्यात बुडाले होते.
सुने आंगण सुद्धा त्याचेच होते,
बुडाले तेही दूरचे नव्हते.
आभाळ म्हणाले, "कसे सांगावे?
दोन्ही कडे माझेच नुकसान व्हावे.
परके असे काहीच नव्हते,
अंतर फक्त मनांचे होते."
आभाळाला आज जाणीव झाली,
दोन्ही अंगणे शेवटी दुःखी राहिली.
कुठे तरी असावा समतोल,
ह्याच जाणीवेलाच खरे मोल.
आभाळ काही एकटे नव्हते,
तेही वाऱ्यावर विसंबून होते.
जसा वाहील, तसे वाहून गेले,
शेवटी निसर्गाच्या स्वभावाला औषध नसते.
.... सुमित जेजुरीकर