Sunday, 20 October 2019

पहिली भेट

मराठी शेर  ....

पाऊले हळूच वळताना तिच्या दाराकडे..
कुठे तरी थांबून पुन्हा निघालो मी..

शोधत होत्या नजरा जिल्या स्वप्नात कधी..
आज तिला शोधन्या तिच्या घरी निघालो मी..

______________________________________________

एकदा गेलो होतो मुलगी बघायला "अहो लग्नासाठी !",
काय करणार प्रेम बिम आमच्या नशिबात नाही..
जीवनाचा साथीदार सर्वांनाच हवा ना मग हा कार्यक्रम तर चुकणार नाही..

कुणी होते लांबचे पाहुणे ज्यांना मी नाही कधी पाहिले,
म्हणाले " अहो मुलगी सालस आहे हो शोभेल तुमच्या मुलाला.."
आठवत नाही ह्या महाभागाने अहो पाहिले कधी होते मला..

घरचे लागले मागे म्हणाले "चल रे एक चक्कर तर मारून येऊ"..
मी पण विचार केला, चला काही नाही तर फुकटचे कांदेपोहे आणि चहा तर मारून येऊ..

प्रथम जाता घरी ती सगळी मंडळी जमली पाहुणचाराला..
अहो नात्यांची देवाणघेवाण होती सोबत तोंडी लावायला..

शेवटी कुणाच्या लक्षात आले कार्यक्रम नक्की कुठला आहे..
बोलावून आणतो मुलीला म्हणून पटकन कोणीतरी आत पळाले..

तिकडून हळू हळू चालत ती आली सावरत साडीचा पदर..
तेवढ्या क्षणात थोडा वेळ का होईना झाली आमची नजरानजर..

ती समोर येऊन बसली आणि चौकशी सत्र चालू झाली..
दोन्ही कडून जणू प्रश्न उत्तराच्या फैरीची सुरवात झाली..

नंतर म्हणाले सगळे अहो तुम्हा दोघांना असेल काही बोलायचं..
मनात म्हणालो "ह्याचीच तर वाट बघत होतो आता नाही मागे हटायचं!"

पहिल्यांदा तिला पाहिलं अन् शब्द अचानक सुचत गेले..
बोलता बोलता तिच्याशी आपसूक काही बंध जुळत गेले..

कुठे तरी बोलताना अचानक धाकधूक मात्र होती जाणवत..
तिलाही थोडंसं अडखळलेल तिचं मन होत काही खुणवत ..

ती बोलताना गालातच हसायची, थोडी आपसूकच लाजायची..
कधी पदराशी खेळायची आणि कधी केस कानामागे घ्यायची..

बोलता बोलता मध्येच थांबून बोर झालं नाही ना विचारायची..
तिची ही प्रत्येक अदा पण माझ्या डोळ्यातून नाही सुटायची..

नुसती शब्दांची झाली देवाण घेवाण नंतर मने सुद्धा मोकळी झाली..
तिच्याशी बोलताना अहो कळलंच नाही कधी किती वेळ निघून गेली..

जेव्हा तिथून निघालो तिच्या चेहऱ्यावर एक हसू होत..
मी तेवढाच आनंदी जसं ते माझ्यासाठीच जणू होत..

निघण्याची वेळ आली पण नजर तिलाच शोधत होती..
रजा घेत जाताना जशी ती समोर दिसायला हवी होती..

निघताना वळून पाहिलं तेव्हा ती बाल्कनीत उभी होती..
काय सांगू मित्रांनो अशी तिची माझी पहिली भेट झाली...

Friday, 23 August 2019

एक सहवास

एक सहवास हवा तुझा अगदी शेवटच्या श्वासपर्यंतचा..
एक सहवास हवा माझ्यापासून तुझ्यापर्यंत पोहचण्याचा..

कधी सोबत जगण्याचा आणि कधी दुरावे सहन करण्याचा..
कधी तुझ्यात मला शोधण्याचा अन् कधी माझ्यात तुला सामवण्याचा..
एक सहवास स्वतःला विसरून तुझा माझ्यासाठी जगण्याचा अन् कधी माझा तुझ्यासाठी जगण्याचा..

कधी जवळ असूनही थोड एकमेकांपासून दूर राहण्याचा..
अन् एकमेकांना ना समजता ही समजून घेण्याचा..
एक सहवास असावा तुझ्या माझ्यातल्या मी पासून आम्ही पर्यंत पोहचण्याचा..

कुठे मागे पडलो तर मागे वळून पाहणारा आणि हात देऊन पुढे घेऊन जाणारा..
कधी चुकलो तर सांभाळून घेणारा तर कधी त्याच चुका दाखवणारा..
एक सहवास असावा कायम साथ देण्याची आशा देणारा आणि नसेल तरी ती आस देणारा..

एक सहवास हवा तुझा अगदी शेवटच्या श्वासपर्यंतचा..
एक सहवास हवा माझ्यापासून तुझ्यापर्यंत पोहचण्याचा..

...सुमित जेजुरीकर

Friday, 26 July 2019

प्रेमाच्या गोष्टी..

खूप झाल्या आता प्रेमाच्या गोष्टी..
त्या कविता लिहण तुझ्या साठी..
तुझ्या प्रेमाच्या अन् तुझ्या विरहाच्या..
तुलाच नावं ठेऊन त्यात तुलाच शोधण्याच्या..

कुठे तरी पूर्ण विराम हवा ना त्याच त्याच जुन्या वेदनांना..
त्या टाहो फोडणाऱ्या भावनांना आणि त्या कारुण्याच्या शब्दांना..

अजुन किती जपणार मी तीच जुनी जखम..
जगात कुठेच नसतं अश्या जखमेच मलम..
आता नाही सलणार ती कारण कुठे तरी ह्याचा अंत हवा..
जुन्या आठवणीचा पाश तोडून नवा एक सूर्य उगवावा..

पुरे झालं आता तुझ्या आठवणी मध्ये हरवण..
शब्दांचे पुल बांधून पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी जाणं..
आज सगळे बांध तोडून मी झुगारून देतो ते बंध..
समजूत घालून स्वतःची सुटका करून घेतो सबंध..

आता घेतला मोकळा श्वास आणि नव्या जगण्याची सुरुवात..
वाट पाहत आहे माझी, रात्र संपून होणारी नवी पहाट..
मागे पडलं हे घडलेलं, विसरून गेलो त्या गाठीभेटी..
समुद्राची लाट जशी वाहत नेते पाऊलखुणांच्या रेती..

आता सगळे विचार नवे आणि नवी वळणे..
मार्ग सोपा नाही तरी थांबणार नाही पावले..
आता नको प्रेम बिम म्हणून मी जेव्हा कुठे सावरलो..
नव्या वाटेवर एका वळणावर मी पुन्हा प्रेमात पडलो..

....सुमित जेजुरीकर

पाऊस

हा पाऊस माझ्या आठवणीतला पाऊस अन् अगदी तुमच्या सगळ्यांच्या आठवणीतला पाऊस..

कुठे तरी जाताना मध्येच थांबवणारा पाऊस..
कुणाची तरी आठवण घेऊन हळूच भिजवणारा पाऊस..
चाललेल्या वाटेवरून परत मागे फिरविणारा पाऊस..

कधी हलक्या हलक्या सरींनी तो मातीला गंध देणारा पाऊस..
कधी वादळा संगे स्वार होऊन सगळं ध्वस्त करणारा पाऊस..
तो सुकलेल्या ओसाड वाळवंटाला हिरवा स्वर्ग करणारा पाऊस..

तो त्या पानांवरच्या दवाला जन्म देणारा पाऊस..
कधी झरा बनून दरीखोर्यातून ओसंडून वाहणारा पाऊस..
ते सौंदर्य पाहून अंगावर शहारे आणणारा पाऊस..

कधी फक्त दुरूनच छान दिसणारा पाऊस..
कधी त्याच्याकडे बघत चहा पीत मस्त   वाटणारा पाऊस..
कधी धुक्याला ओंजळीत घेत हरखून टाकणारा पाऊस..

कधी प्रेमाची नवी पालवी फुलवणारा पाऊस..
कधी विरहाची आठवण करून देणारा पाऊस..
तर कधी तुमच्या आमच्या नात्यातला मायेच्या ओलाव्याचा पाऊस..

कधी नवी आशा जागवणारा तर कधी नैराश्याचा पाऊस..
कधी ग्लासामध्ये बर्फासोबत पडणारा रंगीत पाऊस..
तीच नशा बनून हळू हळू डोक्यात चढणारा पाऊस..

कधी तहाननेल्या जीवाला दिलासा देणारा पाऊस..
कधी त्यातच बुडवून जलसमाधी देणारा पाऊस..
सुजाण कधी अन् कधी उधानलेला पाऊस..

त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा हासू असलेला पाऊस..
ना दिसला तर त्याच्या डोळ्यात दाटून येणारा पाऊस..
कधी त्याच्या हृदयातला पाऊस कधी माझ्या हृदयातला पाऊस..

हा सगळीकडे वेगळा वेगळा असणारा..
कुणाला आनंद तर कुणाला दुःख देणारा..
पण तरीही हवाहवासा वाटणारा..
तुमच्या आठवणीतला पाऊस अन् माझ्या आठवणीतला पाऊस..

....सुमित जेजुरीकर

Saturday, 29 June 2019

"वाह"

दोस्त कहता है "बहोत लिखता है तू अपने टूटे दिल के नगमे, कभी कुछ और दूसरा अच्छा भी लिखा कर"।

मैंने कहा "ये लोग ना बड़े नासाज होते है। दूसरों का गम देख कर बहोत खुश होते है"।

उसने कहा "दिल उनका भी टूटा होगा कभी ना कभी कमिने, तभी तो तेरे नगमे सुनकर "वाह" किया करते है"।

... सुमित जेजुरीकर

Friday, 28 June 2019

अहमियत

तेरे ख्वाबों के निशान रहे ना रहे,पर तेरी चाहत तो दिल में हमेशा रहेगी।
तेरा साथ नसीब मैं ना हो शायद, पर मेरी हर दुआ में तू हमेशा रहेगी।

लोग कहते है किस्मत पे जोर नहीं चलता किसिका, लो मान लिया हमने की तू हमारी ना रहेगी।
बात बस चंद मुलाकातों की थी सनम, लेकिन तू यादों में हमारी हमेशा रहेगी।

गम हमें सताता था तेरी जुदाई का, शायद हवाओं में भी तेरी आहट सुनी रहेगी।
अब दिल कहीं और लगा लिया है हमने, तो अब तनहाई में वो भी बात नहीं रहेगी।

आज फूल खिलते है तो मुस्कुराता हूं देखकर, के इनके खिलने की वजह तो रहेगी।
डालीसे अलग होकर भी खूबसूरत बनाता है जो किसीको, उसकी अहमियत कम तो ना होगी।

...सुमित जेजुरीकर

Friday, 31 May 2019

मी तो सूर्य पाहिला होता..

मी तो सूर्य पाहिला होता...

ती रात्र मोठी होती, जेव्हा तो दूर गेला,
जणू काळरात्र होती, नजरेतून दूर झाला.
तो प्रहर बिकट होता, नभात काळ होता,
त्या चंद्रचांदण्यांच्या प्रकाशी, एक वाट शोधीत होता.
मी तो सूर्य पाहिला होता...

तो सुज्ञ होता पहाटे, जणू साद घालीत होता,
जसा करूनी प्रकाशित, तो मार्ग सांगत होता.
एक सौख्य होते त्याचे, तो नजरेत भरत होता,
ना शरण जाता कुणाला, तो आसमंती स्वार होता.
मी तो सूर्य पाहिला होता...

तो प्रहर आसुसलेला, प्रगतीचा वेग त्याचा,
दिपवून या जगाला, तो मान थोर होता.
सुंदर तो ना जरीही, पण एक गर्व होता,
चालक तो या जगाचा, हा त्याचा अर्थ होता.
मी तो सूर्य पाहिला होता...

तळपून तो निरंतर, कधी उग्र रूप झाला,
कधी होऊनी क्षमाशील, नभात लुप्त झाला.
त्रागा ना खूप त्याचा, पण पर्याय मात्र नाही,
प्रेमाविना त्याच्या, जगणे सुसह्य नाही.
मी तो सूर्य पाहिला होता...

परिक्रमा ही त्याची, जशी पूर्णत्वास आली,
कांती जी प्रखर त्याची, ती धुंद मंद झाली.
ना लाडका जरी हा, पण सह्य मात्र झाला,
कुणी पाठ फिरविली त्याला, कुणी साथीदार झाला.
मी तो सूर्य पाहिला होता...

चाहूल सांज बनूनी, ती काळरात्र आली,
स्पर्शाने मात्र त्याच्या, ती रंगरंगी न्हाली.
तो शमला जरीही, त्याची ख्याती ना नष्ट झाली,
उगवेल तो पुन्हा एकदा, ही आशा व्यक्त झाली.
मी तो सूर्य पाहिला होता...

-....सुमित जेजुरीकर

Tuesday, 14 May 2019

सितारा

वो रात का एक सितारा हैं।
उस चांद से दूर ही सही अपने आप का रोशन उजाला है।
धुंधला पर बहुत प्यारा है।
वो बस एक बंजारा है।

दुनिया की फिकर नहीं खुद में हर दिन गुजारा है।
किसी की जरूरत नहीं उसे वो खुद में जहां सारा है।

आज का डर ना कल की फिकर बस खुले आसमान का पंछी वो।
ना दिन ना रात अपनी धुन का एक गीत है वो।

राह शायद है अलग उसकी मगर उसका खुदका अलग मुकाम है।
तू कौन बताने वाला उसको तेरी क्या बिसाद है।

वो बेहती नदी है उसकी राह बदलना आसान नहीं।
बेह जाएगा मूड जाए तो तेरी कुछ औकात नहीं।

अल्हड़ जवानी हो भले ही उसकी ना समझ सभी के ज्ञानो की।
लेकिन वो तो खरा सोना है प्यारे उसमे कोई खोट नहीं विकारोंकी।

वो खोजें रास्ता चाहे कांटो से गुजरकर जाना हो।
राही की उसको गरज नहीं चाहे अकेले चलते जाना हो।

वो बना लेगी अपने निशान चाहे दुनिया जो भी सोचेगी।
दुनिया की उसको फिकर कहां एक दिन वही उसका रास्ता खोजेगी।

वो ना बिजली वो ना तूफान है ना कोई मझधार है।
वो अपने गति चलेगी तो भी काटे ऐसी एक तलवार है।

तू पूंज उसे ना, ना चाह उसे ना सम्मान कोई देना है।
ध्यान रखो बस अवमान ना हो वरना वो रूप कालीका धरना है।

....सुमित जेजुरीकर

Friday, 26 April 2019

Coffee आणि बरच काही..

एक टेबल, दोन roses, white cups आणि बरच काही..
काही गप्पा, काही थट्टा, काही smiles आणि बरच काही..
कुठे चव, कुठे नजर, कुठे style आणि बरच काही..
तो सुगंध, तो श्वास, तो touch आणि बरच काही..
ते केस, ती चाल, तो साज आणि बरच काही..
ती तू , हा मी, ती coffee आणि बरच काही..

...सुमित जेजुरीकर

Monday, 1 April 2019

भारत का सबसे बडा त्योहार...

आजकल हर जगह नया मौसम छाया है।
सुना है भारत का सबसे बड़ा त्योहार आया है।

कल तक जो कर रहें थे एक दूसरे की बुराई।
आज वोह बने है एक दूजे के भाई भाई।
बस मुंह में तारीफों के पुल बांधने का अवसर पाया है।
सुना है भारत का सबसे बड़ा त्योहार आया है।

कल तक हम बस दोस्त थे आज हम प्रतिद्वंदी है।
कलतक सब थे इंसान आज हिन्दू, मुसलमान और सिंधी है।
आज धर्म,जाती और पंथ को पहचानने का समय आया है।
सुना है मेरे भारत का सबसे बड़ा त्योहार आया है।

खेल तो वैसे यहां रोज चलता है।
कभी इधर से कभी उधरसे कीचड़ उछलता है।
बस आजकल सबने थोड़ा ज्यादा करने का मन बनाया है।
सुना है मेरे भारत का सबसे बड़ा त्योहार आया है।

पाच साल तो बस छलावा है।
हमे तो सबने सालों साल लूटा है।
आजकल बस हिसाब मांगने का समय आया हैं।
सुना है मेरे भारत का सबसे बड़ा त्योहार आया है।

सबको मिला अधिकार बड़ा है।
पर कोई सोचता संकुचित और कोई भला है।
बस अधिकार को समझने का प्रयास कड़ा है।
सुना है मेरे भारत का सबसे बड़ा त्योहार आया है।

...सुमित जेजुरीकर

Monday, 11 February 2019

एकतरफा

होंटोपे ना आ पाया जो केहना था तुमसे कई बार।
लिख भी ना पाया हाल-ए-दिल कागज पे कितनी बार।

उस अनकहे रिश्ते को दिल के किसी कोने में मैंने था संभाला।
हां थोड़ी खता तो थी के तेरा हाथ मेरे हाथो से मिल ना पाया।

दोस्त तो मैं था जरूर पर कभी आगे हिम्मत ना कर सका।
शायद दूसरा नाम देनी की जरूरत महसूस ना कर सका।

लगा कभी अपने दिल की बात तुमसे कह ही दूं।
कहीं थोड़ा सा अपने जज्बातों की राह बदल दूं।

पर तुम क्या सोचती उसका मुझे लगता था डर।
प्यार के इजहार में खो ना जाए हमारी दोस्ती की डगर।

क्योंकि मेरी ना होते हुए भी तुम मेरी ही थी।
मेरे रूह में अपनी जगह बनाए तुम बैठी थी।

तुम्हे हंसते देखना मेरी एक आदत सी बन गई।
तुम्हारे आसुंको देखना जैसे कयामत आ गई।

हमारी दोस्ती में मुझको एक अलग सुकून मिल गया।
के उसे कुछ और रंग देने की मैं चाहत ही ना बना पाया।

कुछ तो हुई होगी गलती मुझेसे भी शायद उन राहों में।
जुदा हो गए हम दोनों और ना बचा कुछ इन पनाहों में।

लगा कि कुछ कहना था तुमको भी शायद मुझसे।
पर मैं ही अपना एकतरफा चलता रहा अपनी सोचसे।

आज कहानी कुछ अलग होती अगर तुम मेरी बाहोंमें होती।
पर क्या हमारी दोस्ती की दास्तां इतनी खूबसूरत सी होती।

....सुमित जेजुरीकर

Thursday, 10 January 2019

कारण मी कवी नाही...

प्रेम केले, पण कधी व्यक्त होता आले नाही..
भावना जरी जपल्या त्या प्रकट मात्र केल्या नाही..
शब्द नसले जोडता आले तरी प्रेम माझे काही उणे नाही..
कारण मी कवी नाही..

माझ्या भावना ही तितक्याच आहेत उत्कट..
जरी त्याला मिळाली नाही शब्दांची चौकट..
पण जपतो मी त्यांना कोणापेक्षा कमी नाही..
जरी मी कवी नाही..

कदाचित असेल मी संसारात गुरफटलेला..
चिंता आणि वेळेच्या बंधनात अडकलेला..
पण त्यासाठी कधी मी सोडला माझा आज नाही..
जरी मी कवी नाही..

निसर्ग असो वा प्रेम किंवा असो नाती वा खेळ..
तितकाच आहे त्यात माझ्या आनंदाचा मेळ..
शब्दात व्यक्त झाला नाही म्हणून तो काही कमी नाही..
कारण मी कवी नाही..

दाद मात्र मी देत असतो. त्या शब्दांना आपलंसं करत असतो.
मला लिहता येत नाही म्हणून त्याला हृदयात जपत असतो.
कधी ते शब्द मला दुसऱ्याचे असे वाटत नाही..
जरी मी कवी नाही..

.... सुमित जेजुरीकर

Sunday, 6 January 2019

मीच मजला सापडलो..

शोधताना मी तुला मी स्वतःला हरवलो..
शब्द सगळे जोडताना अर्थ त्याचा विसरलो..

चालताना माग घेता वाट चुकून मी भटकलो..
रात्र नसताना सुद्धा अंधारात जणू अडकलो..

सागराच्या किनारी पाऊलखुणा म्हणून उमटलो..
लाट येता एक त्याची रेतीसम मी वाहून मिटलो..

गुंतलो धाग्यात इतका की सोडताना गाठ मी तुटलो..
जोडून पाहिले त्यांना जेव्हा नवा मीच मजला सापडलो..

... सुमित जेजुरीकर