मन माझ आज कुठेतरी चुकल्यासारख वाटत
ह्या घनदाट धुक्याच्या धुंदीत हरवल्यासारख वाटत
त्या दवासारखा ओलावा ह्या हृदयात आहे अजून
ह्या ओल्याव्यात मन माझ गेलय भिजून
कळेना ह्या मनाची खळबळ का आहे अशी
जणू कोणीतरी पानपोळी तलावात खेळतय जशी
अजूनही भिजलेल्या ह्या डोळ्यांची साद उरत नाही
त्या पाकळयांसारखा ओठांची याद विरत नाही
ह्या वाटा अजूनच धुसर होत आहेत
ह्या आठवणी मात्र अजूनच पुसट होत आहेत
धुक्यातल्या गारव्यातून चालताना मंद होतो श्वास
का अजून ह्या मनाला तुझ्या परतीची आहे आस
copy paste ki swata lihiliye
ReplyDeleteits my own creation...
ReplyDeleteAjun barych aahet ek ek karun post karen
Mast ek dum sir ...
DeleteThanks Sumit
Delete