Thursday, 20 December 2012

तुझी आठवण ...

काय करू आज काल शब्दच सुचत नाहीत ..
माझ्या मनाची घालमेल कोणीच समजत नाहीत ..

जिथे दिवस सुरु होतो फार अपेक्षा घेऊन ..
रात्र झाली तरी ओझे वाहतो पाठीवरती नेउन ..

कधी कधी विचार येतो द्याव सगळं सोडून ..
जाग येते तेव्हा जेव्हा सगळे येतात धावून ..

काय म्हणावं या जगाला सगळे असच का चालत इथे..
कोणाच्याही भावनांची कदर नाही कोणाला जिथे ..

पण तुझी आठवण येता मात्र सारे विसरून जातो ..
भर उन्हात जणू एक पारवा पाण्यामध्ये न्हातो..

तेव्हा मात्र येतो पुन्हा एकदा हुरूप मनाला ..
मग म्हणतो स्वतालाच करा सुरुवात कामाला..

1 comment: