माझी पिंकी
एक छोटीशी परी पाहिली मी माझ्या लहानपणी..
बहीण म्हणून ओळख करून दिली सगळ्यांनी..
अगदी स्पेशल होती ती लहानपणापासुनच..
गोरी गोरी आणि गुलाबी पिंकी नाव म्हणूनच..
थोडा होता प्रॉब्लेम तरी ती कधी वेगळी पडली नाही..
लढली निकराने त्याच्याशी मागे कधी हटली नाही..
तीच लढण्याची जिद्द तिची कधी आभ्यासात मात्र दिसली नाही..
पण कलाकारच होती आमची माऊ गोष्ट कुठे अडली नाही..
नाचायला आणि फिरायला म्हंटल कि झिंग एकच चढते तिला..
कुठलाही इव्हेंट असो मॅनेजमेंटसाठी हात आहे पहिला ..
भांडकुदळपणा अगदी तिच्या आईकडून शिकली..
पण प्रेमळ आहे तेवढीच पडली मोठ्या मम्मीची सावली..
अशी आहे लाडकी आमच्या सगळयांची माऊ उर्फ पिंकी..
शोधून पण सापडायची नाही कितीही शोधलं आणखी..
No comments:
Post a Comment