Wednesday, 1 January 2025

तुझे माझे नाते शब्दांच्या पलीकडले

तुझे माझे नाते शब्दांच्या पलीकडले,

व्यक्त होण्यासाठी कधीच ना अडलेले।

कधी डोळ्यांनी काही सांगितलेले,

कधी स्पर्शातून हळवे अनुभवलेले।


तुझे माझे नाते शब्दांच्या पलीकडले,

तुझ्या माझ्या साथीत हळूहळू फुललेले।

कधी श्वासांनी शांत विसावलेले,

कधी आसवांनी हळवे सावरलेले।


तुझे माझे नाते शब्दांच्या पलीकडले,

तुझ्या दुराव्यात थोडेसे विखुरलेले।

तुझ्या सहवासात निरागस हसलेले,

तुझ्या चेहऱ्यावरून हळूच ओळखलेले।


तुझे माझे नाते शब्दांच्या पलीकडले।


..... सुमित जेजुरीकर

No comments:

Post a Comment